छट पूजेसाठी गेलेले 50 लाख उत्तर भारतीय परतीच्या वाटेवर, मुंबईत ठरवणार अनेक उमेदवारांचं भवितव्य; कोणाला साथ देणार?
कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला छठ पूजा साजरी केली जाते. विशेषत: बिहार, उत्तरप्रदेश , झारखंडमध्ये या सणाचं विशेष महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपारंपरिक अख्यायिकेनुसार, राम आणि सीता जेव्हा वनवासातून परतले तेव्हा त्यांनी पूजा केली होती. त्यानंतर छठ पूजा हिंदू धर्मतील एक महत्वाचा सण बनला.
छठ पूजा सूर्यदेव आणि त्यांचा पत्नीला समर्पित आहे.
हाच सण साजरा करण्यासाठी मुंबईतून अनेक परप्रांतीय आपआपल्या प्रदेशात गेले.
रेल्वे विभागाच्या माहितीनुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेतून मागील महिन्याभरात 50 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी उत्तर भारतात प्रवास केला आहे.
मुंबईतून आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडला गेलेल्या लोकांना आता परतीचे वेध लागले आहेत.
कारण अवघ्या 9 (दि. 20/11/2024) दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
अनेक काळांपासून ते महाराष्ट्र राज्याचे स्थयिक असल्यामुळे ते महाराष्ट्राचे मतदार झाले आहेत. 20 तारखेपूर्वी जर ते परतले नाहीत तर त्यांना मतदानाला मुकावे लागेल.
आता इतक्या कमी कालावधीत त्यांना उत्तर भारतातून परत आणणे कठीण असल्याचे रेल्वेकडून सांगितले जात आहे.
उत्तर भारतातील प्रवाशांना परत आणण्यासाठी रेल्वेला अधिकाधिक अनारक्षित विशेष गाड्या चालवाव्या लागणार आहेत.
50 लाखांपेक्षा जास्त लोकांना आणण्यासाठी रेल्वेला जास्तीत जास्त गाड्या चालवाव्या लागतील.
त्याचसोबत 27 ऑक्टोबर 2024 बांद्रा टर्मिनस येथील पुनरावृत्ती होणार नाही याची देखील रेल्वे प्रशासनला खबरदारी घ्यावी लागेल.