PHOTOS : आर्यनची झाली 'अनया'! संजय बांगरच्या मुलाचं सुपरडुपर ट्रान्सफॉर्मेशन
माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगर यांचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय बांगर यांच्या मुलाने लिंग बदल शस्त्रक्रिया केली आहे.
शस्त्रक्रियेनंतर आर्यनची अनया झाली आहे. यानंतर आर्यनने एक पोस्ट केली आहे, ज्यात त्याने त्याच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनची कहाणी सांगितली.
इतकंच नाही तर त्याने आता त्याचं नाव आर्यनवरून बदलून अनाया असं केलं आहे.
ही पोस्ट आर्यन बांगरने इंस्टाग्राम अकाउंटवरून (@anayabangar) शेअर केली आहे.
आर्यनने स्टार फलंदाज विराट कोहली तसेच माजी कर्णधार एमएस धोनी आणि त्याचे वडील संजय बांगर यांच्यासोबतचे त्याचे पूर्वीचे फोटो देखील शेअर केले आहेत.
संजय बांगर प्रमाणेच त्यांचा मुलगा आर्यन देखील एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. मात्र, त्याला अद्याप टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेली नाही.
आर्यन बांगर सध्या इंग्लंडमधील मँचेस्टर शहरात राहतो.
त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटनुसार, तो काउंटी क्रिकेटच्या वतीने खेळतो. त्याच्या 145 धावांच्या शतकी खेळीची पोस्टही त्याने शेअर केली आहे.
आर्यनच्या लिंग बदल शस्त्रक्रियेला जवळपास 9 महिन्यांचा काळ लागला.
या संपूर्ण प्रकरणावर आर्यनचे वडील संजय बांगर यांच्याकडून कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.
आर्यनच्या या बदलाकडे पाहून तो आधी मुलगा होता, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही.