PHOTO : आतापर्यंत दुश्मनी पाहिली, आता अजितदादांसोबतची दोस्ती पाहा; विजय शिवतारे-सुनेत्रा पवारांच्या भेटीत काय घडलं?
काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका करणाऱ्या, त्यांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंची भेट सुनेत्रा पवारांनी घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनेत्रा पवार या पुरंदरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विजय शिवतारे यांच्या सासवडच्या घरी भेट दिली.
एकमेकांचे कट्टर विरोधक असं चित्र निर्माण झालेले विजय शिवतारे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच एकाच फ्रेममध्ये दिसल्या.
सुनेत्रा पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्तेही होते. विजय शिवतारेंची भेट ही सुनेत्रा पवारांसाठी महत्त्वाची गोष्ट ठरणारी असेल.
आतापर्यंत अजितदादांनी माझी दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहा असं विजय शिवतारे यावेळी सुनेत्रा पवारांना म्हणाले.
येत्या दोन दिवसात विजय शिवतारे हे सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती आहे.
विजय शिवतारे यांच्यामुळे पुरंदरमधील मोठा मतदारवर्ग हा सुनेत्रा पवारांच्या मागे उभा राहणार आहे.
विजय शिवतारे आणि अजित पवार एकत्रित आल्यामुळे सु्प्रिया सुळे यांच्यापुढे मात्र मोठं आव्हान निर्माण झाल्याचं दिसतंय.