Somvati Amavasya 2024 :'देवा तुझी सोन्याची जेजुरी', तळी, भंडाऱ्याची उधळण, अलोट गर्दी; जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह!
महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची (Khandoba Mandir) जेजुरी (Jejuri) भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे. (फोटो क्रेडिट- मनोज शिंदे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) असून, यळकोट यळकोटचा गजर करत भंडाऱ्याची उधळण करत लाखो भाविक खंडेरायाच्या जेजुरीत (Jejuri Khandoba Yatra) दाखल झाले आहेत. (फोटो क्रेडिट- मनोज शिंदे)
तर भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. कऱ्हा नदीवर देवाचा पालखी सोहळा स्नानासाठी आल्यानंतर भाविकांसाठी पार्किंग सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच महाप्रसादाचे नियोजन देखील करण्यात आलं आहे. (फोटो क्रेडिट- मनोज शिंदे)
राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. (फोटो क्रेडिट- मनोज शिंदे)
जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा (Somvati Amavasya Yatra) आज 8 एप्रिलला भरली आहे. (सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
खंडेरायाच्या सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीत वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत.(सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे, तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. (सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.(सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
सोमवती या दिवशी पर्व काळाची संधी असल्याने जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीवर प्रस्थान ठेवत असतो.(सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणाऱ्या पिवळा गर्द भंडाऱ्याची उधन करीत खंडेरायाचा जयघोष केला. (सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)
कऱ्हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती हाेईल.(सौजन्य- जयंत पांडुरंग थोरवे)