Raj Thackeray Meet CM: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; भेटीमागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या
राज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यांवरुन मनसे नेते आक्रमक झाले आहेत, यानंतर आता शनिवारी (2 डिसेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील टोल नाके आणि दुकानावरील मराठी पाट्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.
टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानावर मराठी पाट्या लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर या भेटीत चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान मनसे आमदार राजू पाटील देखील याठिकाणी उपस्थित होते.
दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबद्दल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
त्यामुळे या भेटीतून आता पुढे काय निष्पन्न होणार? मनसे दुकानांवरील मराठी पाट्यांचा मुद्दा लावून धरणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच कुर्ल्याच्या फिनीक्स मॉलमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ घातला होता.
सूचनेनंतर देखील दुकानांवर मराठी पाट्या का लावण्यात आल्या नाही? असा सवाल मनसे कार्यकर्त्यांनी केला होता.
याआधी देखील राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, या भेटीदरम्यान सुद्धा राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती.
मुंबईचे टोल नाके, एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्वासनं देखील दिली होती.