Pandharpur : विठ्ठल-रखुमाईला उबदार पोशाख! काश्मिरी शाल, रेशमी मुंडासे; शेकडो वर्षांची परंपरा
आज पहाटेच्या काकड्यानंतर देवाला उबदार पोशाख करण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविठोबाला कानपट्टी बांधण्यात आली तर, अंगावर केशरी रंगाची काश्मिरी शाल पांघरण्यात आली.
यासोबतच रुक्मिणी मातेच्याही पैठणीवर ऊबदार अशी शाल पांघरण्यात आली.
आजपासून विठ्ठल रखुमाईला उबदार कपड्यांचा पोशाख केला जातो.
साधारणतः वसंत पंचमीपर्यंत देवाला अशा पद्धतीचा पोशाख केला जातो.
रात्री शेजारतीनंतरही देवाला उबदार कपडे परिधान करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून कायम आहे.
राज्यभरात अवकाळी पावसामुळे थंडीचा कडाका अजून तरी जाणवत नसला तरी, ऋतुमानानुसार विठुरायाला आजपासून उबदार पोशाख परिधान करण्यास सुरुवात झाली आहे.
ऐव्हाना राज्यभरात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत असते, पण यंदा अजून थंडीचा जोर वाढलेला नाही.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात हदल झाला असून अवकळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.