PHOTO : 'सदैव अटल' समाधीस्थळी जाऊन राहुल गांधींचं अटल बिहारी वाजपेयींना नमन
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नवा पायंडा घातला. पक्षीय भावनेच्या पलिकडे जाऊन त्यांनी माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 25 डिसेंबर रोजी जयंती होती. विशेष म्हणजे गांधी कुटुंबातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा मोठा नेता पहिल्यांदाच वाजपेयींच्या समाधीस्थळी पोहोचला
भारत जोडो यात्रेच्या पहिल्या ब्रेकनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (26 डिसेंबर) 'सदैव अटल' या समाधीस्थळी जाऊन अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली
तर 'जय जवान जय किसान' हा नारा देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 'विजय घाट' या समाधीस्थळी राहुल गांधी गेले आणि त्यांना नमन केलं.
राहुल गांधी यांनी सर्वप्रथम त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 'वीर भूमी' या समाधी जाऊन आदरांजली वाहिली.
यासोबतच भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनाही राहुल गांधी यांनी आदरांजली अर्पण केली. 'किसान घाट'वर जात ते नतमस्तक झाले.
त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 'शांती वन' समाधीस्थळी राहुल गांधी पोहोचले आणि त्यांनी आदरांजली वाहिली.
त्यानंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनाही श्रद्धांजली वाहिली. 'राजघाट'वर जाऊन त्यांनी गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं.