दोन टनाची शिवकालीन तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर

उरण येथे आढळलेली शिवकालीन तोफ किल्ल्यावर नेण्यात यश...

Cannons

1/10
गेल्या वर्षभरापूर्वी उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आढळलेली शिवकालीन लोखंडी तोफ पुन्हा किल्ल्यावर नेण्यात शिवप्रेमींना यश आले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही सुमारे सात फूट लांबीची तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर नेण्यात आली आहे.
2/10
उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून २०२१ च्या डिसेंबर महिन्यात किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू असलेल्या कामावेळी लोखंडी तोफ आढळून आली होती. यावेळी, सुमारे सात फूट लांब आणि दोन टन वजन असलेली ही तोफ बाहेर काढून यासंदर्भातील माहिती पुरातत्व विभागाला देण्यात आली होती.
3/10
किल्ल्याची शान असलेली ही तोफ पुन्हा द्रोणागिरी किल्ल्यावर नेण्याचा निश्चय शिवप्रेमी संघटनांनी केला होता.
4/10
यासाठी, रायगड जिल्ह्यातील शिवराज युवा प्रतिष्ठान, द्रोणागिरी लिव लाईफ, दुर्गरक्षक फोर्स -महाराष्ट्र, सह्याद्री प्रतिष्ठान यासारख्या अनेक संघटनांनी या तोफेचे जतन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
5/10
यासाठी, गेल्या दोन आठवड्यांपूर्वी १२ डिसेंबर रोजी सुमारे दिवसभराच्या प्रयत्नानंतर चेनपुली आणि दोराच्या मदतीने किल्ल्यावर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
6/10
यावेळेस, दुर्गप्रेमी जयकांत शिक्रे हे देखील या मोहिमेत सामील झाल्याने दुर्गप्रेमींमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. यावेळी, सुमारे दीडशे दुर्गप्रेमींच्या मदतीने दहा तासांच्या प्रयत्नानंतर ही तोफ किल्ल्याच्या वरच्या टप्प्यात नेण्यात आली होती.
7/10
रविवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा ही तोफ किल्ल्यावर नेण्यास सुरुवात करण्यात आली होती.
8/10
image 9
9/10
यावेळेस, सुमारे दोनशे शिवप्रेमींनी 'हर हर महादेव' आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर यशस्वीरीत्या नेण्यात यश आले आहे.
10/10
सुमारे दोन टन वजनाची तोफ किल्ल्यावर सुखरूपरित्या नेण्यात आल्याने शिवप्रेमींनी भंडारा उधळत जल्लोष करण्यात आला.
Sponsored Links by Taboola