LIC आणखी एका कंपनीत 50 टक्के भागिदारी खरेदी करणार?अपडेट येताच शेअरमध्ये दमदार तेजी
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरमध्ये 4 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. आज एलआयसीचा शेअर 952.50 रुपयांवर पोहोचला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलआयसी आरोग्य विमा क्षेत्रात एक मोठं पाऊल टाकणार आहे. एलआयसी मणिपाल सिग्ना आरोग्य विमा कंपनीत 50 टक्क्यांपर्यंत भागिदारी खरेदी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरुन्स कंपनी बंगळुरु येथील मणिपाल एज्युकेशन अँड मेडिकल ग्रुपची कंपनी आहे. त्यांच्याकडे 51 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित 49 टक्के भागिदारी अमेरिकेतली सिग्ना कॉर्पोरेशनकडे आहे.
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार एलआयसी या माध्यमातून आरोग्य विमा क्षेत्रात मोठं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल. एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांनी काही दिवसांपूर्वी एका योग्य आरोग्य विमा क्षेत्रातील कंपनाचा शोध सुरु असल्याचं म्हटलं होतं. आर्थिक वर्षाच्या शेवटीपर्यंत अंतिम रुप दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं होतं.
एलआयसीचा नफा 4 टक्क्यांनी घसरुन7621 कोटी रुपयांवर आला आहे. तर, निव्वळ उत्पन्न 12 टक्क्यांनी वाढून 1.2 लाख कोटींवर पोहोचलं होतं. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)