Photo: पाकिस्तानी मंत्र्यांचं पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; राज्यात भाजप आक्रमक
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्ष (BJP) आज (17 डिसेंबर) देशव्यापी आंदोलन करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहे. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने आंदोलन केलं आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळेही जाळले आहेत.
Pune: बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात पुण्यात (Pune) भाजपने तीव्र आंदोलन केले.
पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानातील बिलावल भुट्टो असो किंवा भारतातील काही राजकीय पक्ष, यांची भाषा एक सारखी असल्याचा आरोप यावेळी भाजपच्यावतीने करण्यात आला.
Nagapur : नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचा निषेध करत तीव्र आंदोलन केले. सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळा समोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज वाशीम भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात वाशीमच्या पाटणी चौकात येथे हे आंदोलन करण्यात आले.
या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुत्तोचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी पाकिस्तान व बिलावल भुट्टो यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी केली.
Buldhana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात चिखली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेल्या या निषेध आंदोलनात पाकिस्तानी झेंडे, पाकिस्तानचे नकाशे व बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला.