Urvashi Rautela : 1 लाख गुलाबांची भेट; उर्वशीने पोस्ट करत काय म्हटलं?
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिला एका सीनदरम्यान दुखापत झाली होती. उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून, एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तरीच हिला काम मिळत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, हिने स्वत:चा हे सगळे गुलाब आणले असतील. आणखी एका युजरने म्हटलं की, हिचे चाहतेही वेडे आहेत वाटतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी तिच्या बोटाला छोटी जखम झाल्याने ती पुन्हा रुग्णालयात दाखल झाली.
पण यावेळी तिने रुग्णालयातील जे फोटो शेअर केलेत त्यामुळे तिला बरंच ट्रोल केलं जातंय.
उर्वशीने तिचा रुग्णालयातील व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली होती. पण त्यानंतर ती रुग्णालयात असताना तिला तिच्या चाहत्यांनी जवळपास 1 लाख गुलाब भेट म्हणून दिले आहेत.
याच गुलाबांसोबत उर्वशीने रुग्णालयातील फोटोही शेअर केलेत. त्यावरुन नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलंय.
उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत म्हटलं की, मी लवकर बरी व्हावी यासाठी माझ्या एका चाहत्याने मला 1 लाख गुलाब दिले आहेत.
तुम्हा सगळ्यांना खूप खूप प्रेम. दरम्यान उर्वशीने या सगळ्या गुलाबांसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेत.
उर्वशीने तिचा रुग्णालयातला व्हिडिओही शेअर केलाय. त्यामध्ये तिच्या हाताला किरकोळ दुखापत झाल्याचंही पाहायला मिळतंय.
इतकच नव्हे तर तिला या दुखापतीसाठी रुग्णालयातील बरीच उपकरणंही लावली असल्याचं दिसतंय. या व्हिडीओला कॅप्शन देत उर्वशीने म्हटलं की, माझ्यासाठी प्रार्थना करा.
उर्वशीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं असून, एका युजरने कमेंट करत म्हटलं की, तरीच हिला काम मिळत नाही.(pc:urvashirautela/ig)