लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौर्यावर असून आज त्यांनी मनसेचा 7 वा उमेदवार जाहीर केला. तत्पूर्वी 6 उमेदवारांची घोषणा करणात आली असून सोलापूरातून दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंनी सोलापूरमधून पहिल्या दोन उमेवारांची घोषणा केली होती, त्यामध्ये शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, धोत्रे यांनी 2009 सालीही मनसेतून निवडणूक लढवली होती.
मराठवाडा दौऱ्यात राज ठाकरेंनी लातूर ग्रामीण व हिंगोली मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली, लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाडा दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंनी हिंगोली विधानसभा मतदारसंघातून बंडू कुटे यांना उमेदवारी दिली आहे.
विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी तीन उमेदवारांची घोषणा केली असून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राजूरा मतदारसंघातून भोयर यांना तर चंद्रपुरातून मनदीप रोडे यांची उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर केली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या घोषणेबाबत राज यांनी षटकार ठोकल्याचं दिसून आलं.
यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर असेल्या राज ठाकरेंनी आज वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, मनसेनं आत्तापर्यंत एकूण 7 उमेदवार जाहीर केले आहेत