सोशल मीडियावर शाहरुखला टाकलं मागे, पडद्यावर श्रद्धा कपूरची छोटी बहीण झाली, 'ही' सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण?
अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. वयाच्या 7 व्या वर्षी तिने अभिनयाला सुरुवात केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्री जन्नतने 'चांद के पार चलो' या टीव्ही मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
अभिनेत्री जन्नतने भारत का 'वीर पुत्र- महाराणा प्रताप', 'मेरी आवाज ही पहचान' है तसेच 'आशिकी' यांसारख्या शोच्या माध्यमातून अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
बॉलीवूड सिनेसृष्टीत अभिनेत्री जन्नतने 'आगाह द वार्निंग' आणि 'लव का द एंड' सारख्या चित्रपटात काम केलेलं आहे.
अभिनेत्री जन्नतचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले नाही.
अभिनेत्री जन्नत जुबैर सोशल मीडियावर स्टार आहे. इन्स्टाग्राम खात्यावर तिचे 49.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
22 वर्षीय जन्नत जुबेरची एकूण संपत्ती 25 कोटी रुपये आहे. तिच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. तिचं घरही अगदी आलिशान आहे.