Maharashtra Loksabha Election Voting 2024: एकनाथ शिंदेंपासून ठाकरे बंधूंपर्यंत...कोणी कोणी मतदान केलं?, पाहा Photo
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंनी मतदान केलं. दादरमधील बालमोहन विद्या मंदिरात राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पत्नी आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावला.
संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी सहकुंटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
दक्षिण मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत आणि महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी मतदान केलं. यासोबतच उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड, उत्तर पूर्व मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा, वायव्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तिकर, उत्तर मुंबईचे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदान केलं.
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मालाड येथील मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
कांदिवली पूर्व विधानसभा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज गोरेगाव पूर्व येथील दूध सागर सोसायटीच्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी स्वतः आमदार अतुल भातखळकर यांनी सर्वसामान्यांचा रांगेमध्ये लाईन लावून आपला मतदानचा हक्क बजावला.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.