Govinda and Uddhav Thackeray : मै तो रस्ते से जा रहा थाsss उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची वाट अडली, 20 मिनिटे आडोशाला थांबला!
शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेता गोविंदाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे 20 मिनीटे हॉटेलबाहेर थांबावं लागलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोविंदाला त्यांच्या रूमपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच धावपळ करावी लागली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल रात्रीपासून हॉटेल रामामध्ये मुक्कामी आहेत.
त्याच हॉटेलमध्ये शिवसेनेचे संदिपान भुमरे यांच्या प्रचारासाठी आलेला अभिनेता गोविंदाही रात्रीपासून मुक्कामी आहे.
या दोघांच्याही रूम्स एकाच मजल्यावर आहेत.
आज दुपारी गोविंदा हॉटेलमधून बाहेर पडून शहरात गेला होता.
त्यानंतर दुपारी पावणे तीनच्या सुमारास तो हॉटेलच्या गेटवर पोहचला.
त्याचवेळी उद्धव ठाकरे हे जालन्याच्या सभेला जाण्यासाठी रवाना होत असल्याची धावपळ सुरू झाली.
हे गोविंदा सोबत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळल्यानंतर गोविंदाला त्यांनी हॉटेलच्या बाहेर आडोशाला थांबवले.
पण उद्धव ठाकरे हे काही लवकर बाहेर पडले नाहीत.