Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Janmashtami Utsav 2024 : झी मराठीवरील कलाकारांच्या धम्माल मज्जा मस्तीत रंगणार कृष्णजन्माष्टमीचा उत्सव! पाहा फोटो
भारतात तसेच महाराष्ट्रात कृष्णजन्मोत्सव आणि दही हंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवादरम्यान तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोठ मोठ्या हंड्या बघण्यासाठी बालगोपाळांची गर्दी होताना आपण पाहत असतो. उंचावर बांधलेल्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा लागलेली असते.
यावर्षी आपल्या 25व्या वर्धापनदिनाचं औचित्य साधत झी मराठीसुद्धा या उत्सवामध्ये सहभागी होणार आहे. आपल्या प्रेक्षकांसाठी 'गोविंदा आला रे' हा खास कार्यक्रम झी मराठी घेऊन येत आहे.
हा दही हंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी संपूर्ण झी मराठी कुटुंब एकत्र आलंय.
या दही हंडी जल्लोषाचं आकर्षण असणार आहे एजे-लीलाचा भन्नाट डांस, शिवा-आशु आणि पारू आदित्यचा डान्स ऍक्ट आणि आवडत्या जोड्यांचे मजेदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
संकर्षण कऱ्हाडे 'गोविंदा आला रे' चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. अभिनेत्रींचा मराठामोळा साज यावेळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सर्वात आकर्षणाचा विषय म्हणजे कृष्ण रूपात कोण असणार तर अप्पीचा अर्जुनाचा मुलगा आणि सर्वांचा लाडका नटखट अमोल बाळकृष्णच्या रूपात येऊन खूप मस्ती करणार आहे.
हा रंगतदार सोहळा तुम्हाला 25 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता झी मराठीवर पाहता येईल.