Eknath Shinde Birthday : एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा, iPhone ने कापला केक, DCM च्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सर्वांच्याच नजरा, पाहा PHOTOS

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी विशेष सेलिब्रेशन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे यांनी औक्षण केले. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातू रुद्रांश आणि कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यानंतर केक कापताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या iPhone ने केक कापला.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
सेलिब्रेशन दरम्यान आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चिमुकल्या डुप्लिकेटला पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या.
एकनाथ शिंदे यांनी चिमुकल्याशी गप्पादेखील मारल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.