Kuldeep Yadav : दुखापत की दुसरं काही.... रोहित शर्माने कुलदीप यादवला संघातून का बाहेर फेकले? म्हणाला ...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कटकमध्ये खेळला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय संघ व्यवस्थापनाने या सामन्यासाठी कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे.
त्यांच्या जागी वरुण चक्रवर्तीला बोलावण्यात आले आहे. वरुण चक्रवर्तीने वयाच्या 33 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
रोहित शर्माने नाणेफेकीदरम्यान याचे कारण सांगितले. तो म्हणाला की, आम्ही कुलदीप यादवला विश्रांती दिली आहे. म्हणूनच वरुण चक्रवर्तीने त्यांची जागा घेतली आहे.
रोहितने असेही सांगितले की, विराट कोहली परतला आहे आणि त्याने यशस्वी जैस्वालची जागा घेतली आहे.
गेल्या सामन्यात कुलदीप यादवची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्याने फक्त 9.4 षटकांत 1 विकेट घेतला. यात त्याने 53 धावाही दिल्या.
त्याच वेळी, वरुण चक्रवर्तीने अलिकडच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.