PHOTO : घोषणाबाजीतून सरकारला टोले, धनंजय मुंडेंनी विधीमंडळातील आंदोलन गाजवलं
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. त्यांनी आपल्या घोषणांमधून भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना टोले लगावले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो
ईडी सरकार हाय हाय
महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं.
सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच '50 खोके, एकदम ओक्के', 'आले रे आले गद्दार आले', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.