PHOTO : ‘नवरी मिळे नवऱ्याला’च्या सेटवर जमली जोडी, ‘अशी’ होती सचिन-सुप्रिया यांची प्रेमकहाणी!

मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे.

Continues below advertisement

Sachin Pilgaonkar And Supriya Pilgaonkar

Continues below advertisement
1/6
मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी जोडी अर्थात अभिनेते सचिन (Sachin Pilgaonkar) आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांचा आज (17 ऑगस्ट) वाढदिवस आहे.
2/6
विशेष म्हणजे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. या जोडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणाऱ्या या जोडीची प्रेमकथाही अशीच खास आहे.
3/6
एका मराठी चित्रपटाच्या सेटवर या दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. लहानपणापासून सचिन पिळगावकर यांना अभिनय क्षेत्रात यायचे होते. सचिन यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
4/6
अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा प्रचंड गाजला. या चित्रपटात त्यांनी सुप्रिया यांना मुख्य भूमिकेसाठी निवडले होते. त्यावेळी सुप्रिया या नवोदित अभिनेत्री होती. मात्र, या चित्रपटातून त्या घराघरांत पोहोचल्या.
5/6
या चित्रपटाच्या सेटवरच सचिन यांना सुप्रिया आवडू लागल्या होत्या. दोघांच्या वयात तब्बल 10 वर्षांचा मोठा फरक होता. त्यावेळी सचिन यांनी आपल्या मनातील गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यावर आईने देखील त्यांना होकार दिला होता.
Continues below advertisement
6/6
1 डिसेंबर 1985मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या जोडीने ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरत घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपूते’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
Sponsored Links by Taboola