Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली
महाराष्ट्राचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज शपथ घेतली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस... असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद व गोपनियतेची शपथ घेत स्वत:च्या नावावर वेगळा विक्रम रचला.
तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister) शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली.
फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला
गावागावात, मतदारसंघात आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
नियोजित वेळ आणि तारखेनुसार आज शपथविधीचा सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.