Zomato Share Price : झोमॅटोच्या शेअरनं 22 महिन्यात दिला 512 टक्के परतावा, शेअर पहिल्यांदा 300 पार, गुंतवणूकदार मालामाल
झोमॅटो कंपनीचे शेअर पहिल्यांदा 300 रुपयांच्या वर गेले. बीएसईवर 6 टक्क्यांच्या वाढीसह शेअर 304.50 रुपयांवर पोहोचले. कंपनीचं बाजारमूल्य 3 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appग्लोबल ब्रोकरेज हाऊस CLSA नं झोमॅटोचा शेअर 370 रुपयांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रातील ही भारतातील आघाडीची कंपनी आहे.मॉर्गन स्टॅनली कंपनीनं झोमॅटोचे शेअर 355 रुपयांवर जातील असा अंदाज वर्तवला आहे.
झोमॅटोचे शेअर गल्या वर्षभरात 157 टक्क्यांनी वाढले आहेत. 5 डिसेंबर 2023 ला झोमॅटोचा शेअर 116.65 रुपयांवर होता. यावर्षी 5 डिसेंबर 2024 ला कंपनीचा शेअर 304.50 रुपयांवर आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच 3 फेब्रुवारी 2023 ला झोमॅटोचा शेअर 48.80 रुपयांवर होता. आजच्या दिवशी झोमॅटोचा शेअर 304.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 22 महिन्यात झोमॅटोच्या शेअरची किंमत 515 टक्क्यांनी वाढली आहे.
झोमॅटोचा आयपीओ 14 जुलै 2021 ला आला होता. कंपनीच्या आयपीओचं लिस्टिंग झालं तेव्हा एका शेअरची किंमत 76 रुपये होती. झोमॅटोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतंय.