Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मोदींना भेटले, छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट देण्याचं कारणही सांगितलं
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
12 Dec 2024 01:22 PM (IST)
1
देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दीर्घकाळ चर्चा केली.
3
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, पंतप्रधान मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली.
4
या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
5
मात्र या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
6
दरम्यान कालपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत.
7
बुधवारी रात्री फडणवीसांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत भेटीगाठी केल्या.