IPO Update : रेखा झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ खुला, GMP पोहोचला 422 रुपयांवर,दमदार परतावा मिळणार?
रेखा झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या इनवेंचर्स नॉलेज सोल्यूशन्स कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी आजपासून खुला झाला आहे. या आयपीओतून 2497.92 कोटी रुपयांची उभारणी करायची आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकंपनीचे सध्याचे शेअरधारक त्यांच्या शेअर्सची विक्री करणार आहेत. हा आयपीओ ऑफर फॉर सेलसाठी काढण्यात आला आहे. आयपीओ आजपासून ते 16 डिसेंबरपर्यंत खुला असेल.
कंपनीनं त्यांच्या समभागाचा किंमतपट्टा 1265 ते 1329 रुपये निश्चित केला आहे. कंपनीकडून एका लॉटमध्ये 11 शेअर ठेवण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना किमान 14619 रुपयांची बोली लावावी लागेल.
आयपीओ अलॉट झाली की नाही याबाबतची अपडेट 17 डिसेंबरला मिळेल. तर, हा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होईल.
रेखा झुनझुनवाला या कंपनीच्या प्रमोटर्स आहेत. त्यांच्याकडे 390478 शेअर आहेत. त्यांची भागिदारी 0.23 टक्के आहे.या आपीओचा जीएमपी 422 रुपयांवर पोहोचला आहे. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना जवळपास 31 टक्के परतावा मिळू शकतो.