महिला बेपत्ता होणं, चिमुरड्या मुलींवर अत्याचारांच्या प्रश्नावर छत्रपती शिवरायांचा दाखला देत काँग्रेस आक्रमक, महायुती सरकार विरुद्ध पोस्टरबाजी
महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या मुद्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.महाराष्ट्र राज्य हे महिलांचा सन्मान करणारे राज्य आहे, पण राज्याला भ्रष्टयुतीची नजर लागली. ज्या राज्यात शिवरायांनी रांझ्याच्या पाटलांचा चौरंगा केला त्याच राज्यात महिला बेपत्ता होत आहेत, शाळेत जाणाऱ्या चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहेत, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला बेपत्ता होणं अन् लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना या गोष्टी सरकारला दिसाव्यात म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभरात पोस्टर लावून सरकारच्या नाकर्ते पणावर प्रकाश टाकल्याचा दावा केला आहे.
प्रत्येक वर्षी, महाराष्ट्रातील 64 हजार महिला अन् मुली बेपत्ता होतात ही अत्यंत गंभीर बाब आहे, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेसनं या पोस्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेसच्यावतीनं राज्यभरात लापता लेडीज मोहिमेद्वारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
काँग्रेसकडून मुंबईत विविध भागात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. अंधेरी, पानेरी, एसव्ही रोड भागात ही पोस्टर्स लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं.