PHOTO : मुख्यमंत्र्यांकडून डॉ. हेडगेवारांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन, दीक्षाभूमीलाही भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरातील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री सकाळी साडेदहाच्या सुमारास रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे दाखल झाले आणि त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.
कोणत्याही दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री आरएसएसच्या कार्यालयात येण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.
याआधी 27 डिसेंबर रोजी भाजपचे सर्व आमदार स्मृतिभवन परिसरात आले होते. त्या दिवशी भाजप आमदारांसोबत शिंदे गटाचे आमदार ही येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्या दिवशी फक्त भाजप आमदार संघ कार्यालयात आले होते.
मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रेशीमबागला आले आणि डॉ. हेडगेवार यांच्यासमोर नतमस्तक झाले.
हे एक प्रेरणास्थान आहे, स्फूर्तीस्थान आहे. इथे नतमस्तक व्हायला आलोय. यात कोणताही राजकीय हेतू नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान रेशीमबाग इथून निघाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट दिली.
इथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेऊन हार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी अस्थिकलशाचं दर्शन घेतलं.