Photo : भंडाऱ्यात केळीचं विक्रमी उत्पादन
भंडारा जिल्ह्यात केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा हा तांदूळ उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यात आता केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदाही होत आहे.
भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे कल वाढत आहे. तांदूळ पिकाला फाटा देत आहेत. केळीच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
केळीच्या पिकातून शेतकऱ्यांना एकरी तीन ते चार लाखांचा नफा मिळत आहे. त्यामुळं तांदूळ पिकाच्या तुलनेत केळीची शेती शेतकऱ्यांना परवड असल्याचं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
शेतकरी सातत्यानं शेतात नवनवीन प्रयोग करत आहेत, तर कुठे पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत.
राज्यात भंडारा हा जिल्हा भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना येथील उच्च प्रतीच्या तांदळाला भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी असते. मात्र, आता इथे केळीचे पीक घेतलं जात आहे.
मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक भात पिकाची शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत बागायती शेतीतून केळीचे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. केळीच्या पिकातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.
मोरेश्वर सिंगनजुडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुरुवातीला दोन एकरात प्रायोगिक तत्त्वावर केळी पिकाची लागवड केली. त्यात त्यांना मोठा आर्थिक लाभ झाल्यानं आता चार एकर क्षेत्रावर त्यांनी केळीची लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे.
केळीचा नफा एकरी तीन ते चार लाखांच्या आसपास मिळतो. हा नफा म्हणजे तांदूळ पिकातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा सुमारे चार पट अधिक आहे.