PM Narendra Modi Shirdi Visit Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यात काय काय करणार?
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून शिर्डी साईमंदिरात त्यांनी दर्शन घेतलं;. यावेळी पाद्यपूजेसह साईदर्शन घेत आरतीही संपन्न झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी पीएम मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार त्याचबरोबर राज्यपाल रमेश बैस हे देखील मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.
शिर्डीतील साई मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी नतमस्तक झाले.
या सुमारास अर्धा तास मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्य पूजा करण्यात आली.
त्याचबरोबर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वातानुकूलित सुसज्ज अशी दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यात आले.
राज्यातील 14 हजार कोटी रुपयांची विविध प्रकल्पांचे, विकासकामांचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार.
यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल.
पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील.
सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील.