Baramati : बारामतीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या 18 खाजगी अकॅडमींना टाळे
बारामती शहरात नगरपरीषदेच्या प्रशासनाने वारंवार सूचना करुन देखील नियमांचे उल्लंघन करणे खाजगी अकॅडमीचालकांना महागात पडले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या अकॅडमीवर बारामतीत नगरपरिषद प्रशासनाने टाळे ठोकले आहे.
बारामती शहरातील 18 अकॅडमीला टाळे ठोकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
बारामतीतील मोहसीन पठाण हे बेकायदेशीर अकॅडमीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीनंतर शहरात ज्या अकॅडमी नियमबाह्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक पद्मनाथ कुल्लरवार यांना दिले होते.
अनेक अकॅडमीने अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.