Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून गावकऱ्यांनी सदावर्तेंसह मराठा नेत्यांची काढली अंत्ययात्रा
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव येथे मराठा समाजासह गावातील सर्वधर्मीय गावकऱ्यांनी आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा समाजाच्या व आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते,व मराठा कुणबी या विरोधात वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
गुरूवारी सकाळी दहा वाजता या तिघांचीही गावात अंत्ययात्रा काढुन मराठा समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी निषेध केला.
यावेळी गुणरत्न सदावर्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मंत्री रामदास कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर, शासनाने उपोषणाची वेळ येऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
सरकारने तत्काळ ओबीसीतुन मराठा आरक्षण द्यावे अशी मागणी खोडेगाव येथील मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी केली.
विशेष म्हणजे या अंत्ययात्रेला मडके घेऊन मुस्लिम युवक व गावातील ओबीसी, मुस्लिम,दलित बांधव मोठ्या प्रमाणावर सामिल झाले होते.
यावेळी जोरदारपणे घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच तत्काळ आरक्षण देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.