Petrol-Diesel : देशभरात पाण्यासाठी नाही तर चक्क 'पेट्रोल'साठी कॅन घेऊन रांगा!
हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया संपामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची बातमी पसरताच देशभरात पेट्रोल पंपावर चक्क 'पेट्रोल'साठी कॅन घेऊन रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं! (Photo Credit : PTI)
हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातल्या मालवाहतूकदारांनी संप पुकारण्यात आला आहे, त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसल्याचं दिसून येतंय. (Photo Credit : PTI)
पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक भागात पेट्रोल मिळेनासं झालं. (Photo Credit : PTI)
पेट्रोल न मिळण्याची शक्यता गृहीत धरून अनेक भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली.(Photo Credit : PTI)
दुसरीकडे वाहतूकदारांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली, यामुळे भाजीपाला महाग होऊ शकतो. (Photo Credit : PTI)
परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्या. राज्यातून 400 ते 425 गाड्याच एपीएमसीत आल्या. नेहमीपेक्षा 100 ते 150 गाड्यांची आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाला 20 ते 25 टक्के महागला. (Photo Credit : PTI)
अनेक भागात पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने स्कूलबसही रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. (Photo Credit : PTI)
संपाचा मोठा परिणाम एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर झाला. (Photo Credit : PTI)
एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बहुतांश भागात झालेला नाही त्यामुळे घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक यांना या संपाचा मोठा फटका बसलाय. (Photo Credit : PTI)