Durva Health Benefits : औषधी गुणधर्मांनी समृद्ध दुर्वा 'या' शारीरिक समस्या दूर करतात...
मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी दुर्वांचा रस प्यावा, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीर डिटॉक्स करण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. शरीराचे संसर्गापासून सरंक्षण होते. (Photo Credit : pixabay)
दुर्वा या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात,त्यामुळे उष्णतेशी संबंधित कोणत्याही त्रासावर दुर्वांचा रस प्यावा. (Photo Credit : unsplash)
युरीन इन्फेक्शन कमी करण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. दुर्वांचा रसामुळे आराम मिळतो. (Photo Credit : unsplash)
मासिक पाळीत खूप पोटदुखी, डोकेदुखी आणि पाठदुखी होत असल्यास दुर्वांचा रस प्यावा, शरीराला आराम मिळतो. (Photo Credit : pixabay)
बद्धकोष्ठता,अपचनासारख्या समस्यांवर दुर्वांचा रस रामबाण उपाय ठरतो. दुर्वांचा रस हा पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो. (Photo Credit : pixabay)
दुर्वांमधील पोषक तत्त्वे आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उत्तम मार्ग आहे, त्यामुळे रोज थोडातरी दुर्वांचा रस प्यावा. (Photo Credit : unsplash)
दुर्वांमधील पोषक घटक मुळव्याधीचा त्रास कमी करण्यास मदत करतात. मुळव्याधीचा त्रास कमी प्रमाणात होत असल्यास दुर्वांचा रस रोज सकाळी प्यावा. (Photo Credit : unsplash)
त्वचेच्या आरोग्यासाठीही दुर्वा फायदेशीर ठरतात. चेहऱ्यावर पुरळ आणि काळे डाग असल्यास दुर्वांचा रस त्यावर मदत करतो. त्वचेचा दाह कमी होतो. (Photo Credit : pixabay)
तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पिणे फायदेशीर ठरते. घसा खवखवत असेल आणि उलट्या होत असतील तर दुर्वांचा रस प्यावा. (Photo Credit : pixabay)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)