Ambedkar Jayanti 2023 : परभणीत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल 55 हजार चौरस फुटाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळी परभणी करांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 55 हजार चौरस फूट प्रतिमेसाठी तब्बल 120 क्विंटल रांगोळी लागली आहे
तब्ब्ल 7 दिवसात परभणीच्या 16 कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे.
अतिशय सुदंर आणि भव्यदिव्य अशी प्रतिकृती पाहण्यासाठी परभणी कर मोठी गर्दी करत आहेत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे
यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत