Shiv Jayanti 2023 : शिवजयंती निमित्त 3100 चौरस फुटांची रांगोळी; कलाकारांनी राजमुद्रेत साकारली शिवरायांची हुबेहूब प्रतिकृती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2023 06:02 PM (IST)
1
आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
शिवजयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
3
परभणीत सुदर्शना कच्छवे आणि तिच्या सहकारी कलाकारांनी 5 दिवस सतत काम करून अनोख्या पद्धतीने शिवरायांना वंदन केलं आहे.
4
तब्बल 3100 चौरस फुटांत राजमुद्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याभोवती अष्टप्रधान मंडळ असलेली रांगोळीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
5
शहरातील गांधी पार्कमध्ये ही अतिशय देखणी प्रतिकृती या कलाकारांनी साकारली आहे.
6
शिवरायांची प्रतिकृती साकारण्यासाठी 500 पोते रांगोळी या कलाकारांना लागली आहे.
7
शिवरायांसह त्यांचे अष्टप्रधान मंडळ असलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली आहे.