Garden Tourism Festival : रंगीबेरंगी फुलांनी तयार केले प्राणी आणि पक्षी, गार्डन टुरिझम फेस्टिव्हलची पाहा एक झलक
35th Garden Tourism Festival Delhi : 35व्या गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आलं आहे. या बागेत फुलं आणि पानांपासून तयार केलेल्या विविध कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते गार्डन ऑफ फाइव्ह सेन्स येथे दिल्ली सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 35व्या गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात आलं.
या बागेत जाऊन तुम्ही गार्डन टुरिझम फेस्टिव्हलचा आनंदही घेऊ शकता. हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांनी वसंत ऋतुचे स्वागत करण्यासाठी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे.
गार्डन टुरिझम फेस्टिव्हल रविवारी (19 फेब्रुवारी) रोजी रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला झेंडूच्या फुलांनी बनवलेला मोठा चित्ता, झेंडूपासून बनवलेला कुतुबमिनार, निळ्या ऑर्किडची आरास करुन बनवलेला मोर या सर्व फुलांपासून बनवलेल्या कलाकृती पाहायला मिळतील.
या गार्डन फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला 300 हून अधिक प्रकारची फुले आणि झाडे, झुडुपे, बोन्साय आणि ट्रे गार्डन्स पाहायला मिळतील.
मागील 33 वर्षांपासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये दिल्ली सरकारकडून या महोत्सवाचे आयोजन केलं जातं.
दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागाने यावर्षी G20 साठी गार्डन ऑफ फाइव्ह सेन्सेस 'गार्डन ऑफ युनिटी' या थीम असून त्यानुसार फेस्टिव्हलमधील सजावट करण्यात आली आहे.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि निसर्गाविषयी आवड निर्माण करण्यासाठी या वर्षी पक्षी आणि प्राणी यांच्या विविध आकर्षक आकारात फुले आणि वनस्पतींची सजावट करण्यात आली आहे.