Palghar News: वेरोली नदीमध्ये शेकडो मृत माशांचा खच; केमिकलयुक्त सांडपाण्याने बळी घेतला?
पालघर जिल्ह्यामधील तलासरी तालुक्यातील वेरोली या नदीत मृत माशांचा खच आढळून आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्तींनी या नदीत कंपन्यांमधून निघणारे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी टँकरच्या सहाय्याने या नदीत सोडले असल्याचा आरोप होत आहे.
या केमिकलयुक्त सांडपाण्याने हा प्रकार घडला असल्याचे आलं आहे.
या प्रकारामुळे शेकडो मृत अवस्थेत मासे नदीच्या तीरावर आले आहेत
वेरोली नदी ही तलासरीतील झरी, गिरगाव, वडवली, वंकास, सवणे, धामणगाव या गावातून वाहत पुढे समुद्राला मिळते.
वेरोली नदीतील पाणी या गावांमधील शेतकरी शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात.
आता या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नदीतील प्रदूषणाचा दुष्परिणाम शेतीवर आणि स्थानिकांच्या आरोग्यावर होऊ नये अशी अपेक्षा केली जात आहे.
तसंच या प्रकरणात योग्य तपास करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीकांकडून केली जात आहे.
नदीतील प्रदूषणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.