Black Tire : ...म्हणून गाड्यांच्या टायरचा रंग काळा असतो
सायकलपासून विमानापर्यंत जेव्हाही आपण टायर पाहतो तेव्हा त्यांचा रंग नेहमीच काळा असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअगदी लहान मुलालाही विचारल्यास टायरचा रंग कोणीही काळा असाच सांगेल. मात्र, टायर काळ्याच रंगाचे का असतात?
टायर काळा रंगाचे असण्याची सुरुवात नेमकी कधीपासून सुरु झाली? इतर रंगांचे टायर का नसतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
टायरचा इतिहास साधारण 1800 सालापासून सुरू होतो.
1839 मध्ये, चार्ल्स गुडइयरने व्हल्कनाइज्ड रबरचा शोध लावला, ज्यापासून यशस्वी टायर बनविण्यात आले.
टायर हा शब्द टायरर या फ्रेंच शब्दापासून बनला आहे. पूर्वीच्या काळी माणसांनी त्यांच्या काळात चामड्याचे, लोखंडाचे आणि लाकडी टायर बनवले होते.
126 वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा टायर तयार केले गेले तेव्हा त्यांचा रंग पांढरा होता. कारण ते ज्या रबरापासून बनवले होते ते पूर्णपणे दुधाळ पांढरे होते.
मात्र, हे साहित्य अतिशय कमकुवत असल्याने वाहनांचे वजन नीट घेता येत नव्हते. त्यामुळेच नंतर ते मजबूत होण्यासाठी त्यात कार्बन ब्लॅक मिसळावा लागला, त्यामुळे त्याचा रंग काळा झाला.
यामुळे टायर अत्यंत शक्तिशाली आणि मजबूत बनले, जे आज सर्वत्र वापरले जातात. म्हणून टारचा रंग हा पिवळा, लाल, हिरवा नसून काळ्या रंगाचा असतो.