Robot Cafe : माणसं नाही फक्त रोबोटच करणार काम, जगातील पहिला रोबोट कॅफे
जगभरात अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लागत आहे. मानवाने अशा रोबोटची निर्मिती केली आहे, जे भविष्यात मानवाप्रमाणे सर्व काम करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजे मनुष्य आज करू शकतो कदाचित त्याहूनही चांगले हे रोबोट भविष्यात करू शकतील. त्यामुळे येत्या काळात माणसाच्या जागी रोबोट काम करताना दिसले, तर त्यात नवल वाटायला नको.
आता जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. दुबईमध्ये जगभरातील पहिला आणि एकमेव पूर्णपणे रोबोटिक ऑपरेटेड असा कॅफे सुरु करण्यात येणार आहे.
दुबईमध्ये यावर्षी जगातील पहिला रोबोट कॅफे सुरु करण्यात येणार आहे. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास खुला असेल आणि यामध्ये एकही मनुष्य काम करणार नाही.
म्हणजेच तुमची कॉफी बनवण्यापासून ते तुम्हाला कॉफी सर्व्ह करण्यापर्यंतची सगळी कामं रोबोटच करतील. दुबईमध्ये उघडण्यात येणारा हा कॅफे जगातील पहिला कॅफे मानला जाईल, जिथे कोणत्याही माणसाशिवाय संपूर्ण कॅफे फक्त रोबोटच चालवतील.
या वर्षी दुबईमध्ये हा कॅफे उघडण्यात येईल. हा जगातील एकमेव पूर्णपणे रोबोट-ऑपरेटेड कॅफे असेल. या रोबोट कॅफेचे नाव डोना सायबर कॅफे असेल. या कॅफेची खास गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास सुरु असेल.
या कॅफेमध्ये काम करणारे रोबोट कोणताही सामान्य रोबोट नसून आधुनिक सुपरमॉडेल रोबोट असणार आहेत. येथे तुम्हाला कॉफी, आइस्क्रीम आणि अनेक प्रकारचे स्नॅक्स मिळतील.
हे खास सुपरमॉडेल रोबोट कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची विशेष काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. कॅफेमध्ये बसून जर कोणत्याही ग्राहकाला कंटाळा आला तर हे सुपरमॉडेल रोबोट त्याला रंजक किस्से सांगून मनोरंजन करेल
रोबोट व्यक्तीशी बोलून त्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय हे रोबो ग्राहकांच्या भावना समजून घेण्यासही सक्षम आहेत. म्हणजेच तुमचे हावभाव पाहून तुमचा मूड कसा आहे हे या रोबोटला कळेल.