Janmashtami 2023 : गोकुळाष्टमीनिमित्त वसईतील शिक्षकाने मोरपिसावर रेखाटले श्रीकृष्णाचे चित्र!
वसईतील न्यू इंग्लिश स्कूलमधील कलाशिक्षक कौशिक दिलीप जाधव यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोरपीसावर श्रीकृष्णाचे चित्र रेखाटले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रीकृष्णाच्या डोक्यावर कायमच आपल्याला मोरपीस पाहायला मिळते.
पण या मागील अख्यायिका अशी आहे की, राम अवतारात वनवासात असताना एकदा सीतेला तहान लागली, पाण्याचा शोध घेताना रामाला पाणी कुठेच मिळाले नाही.
तेव्हा पाण्याचं ठिकाण सापडण्यासाठी मोराने आपल्या पिसाऱ्यातील एक एक पीस गाळत पाणवठ्याच्याची दिशा रामाला दाखवली.
म्हणून रामाने प्रसन्न होऊन मी तुझं हे ऋण कृष्ण अवतारात पीस कायम माझ्याजवळ आठवण म्हणून ठेवीन, असं सांगितलं.
यामुळे कृष्णाला मोरपीस आवडते. म्हणून या चित्रकाराने चक्क मोरपीसावरच भगवान श्रीकृष्णाचे चित्र रेखाटले आहे.
हे चित्र काढण्यासाठी त्यांना एक तासाचा वेळ लागला. हे चित्र वॉटर कलर्स माध्यमातून रंगवलेले आहे.