Himachal Pradesh: शिमल्यात पर्यटकांची रेलचेल; हवामान स्थिरावल्याने वर्दळ वाढली, पाहा फोटो
शिमल्यातील डोंगर परिसरातील दृश्य अतिशय सुंदर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहळूहळू शिमल्यात पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
हवामानामुळे पर्यटन व्यवसाय अजूनही रुळावर आलेला नसला तरी पर्यटकांची पावलं शिमल्याकडे वळली आहेत.
असं असतानाही पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आगामी काळात शिमल्यातील व्यवसाय सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
सततच्या उन्हामुळे शिमल्याच्या तापमानातही वाढ झाली आहे.
शिमला शहरात वातावरण अल्हाददायक झालं आहे.
स्थानिक नागरिकांसोबतच येथे येणारे पर्यटकही या हवामानाचा आनंद घेत आहेत.
येत्या काही दिवसांतही शिमल्यातील हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी संपूर्ण शहरात ऊन पडलं होतं, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी याचा पुरेपूर आनंद घेतला.
शेजारील हरियाणा, पंजाब आणि दिल्ली या राज्यांतूनही शिमल्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे.
डोंगरांनी नटलेलं शिमला शहर उंचावरुन फारच नयनरम्य दिसत आहे.