Ram Navami : पालघरमधील सातपाटीच्या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा
आज देशभरात राम नवमीचा (Ram Navami) उत्साह साजरा केला जात आहे. यानिमित्त अयोध्येत आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील अनेक गावांना प्राचीन राम मंदिरांचा वारसा लाभला आहे. या मंदिरांवर देखील दृष्टीक्षेप टाकणं महत्वाचे आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे सर्वात मोठं जवळपास 28 हजार लोकवस्तीचं समुद्र काठावर वसलेलं निसर्गरम्य गाव आहे
पालघर (Palghar) जिल्ह्यातील सातपाटी (Satpati) इथेही असेच एक प्राचीन राम मंदिर आहे. या राम मंदिराला 140 वर्षाची परंपरा आहे.
या गावात मोठ्या प्रमाणात मच्छीमार लोकवस्ती आहे. या गावाची शोभा म्हणजे गावातील रामाचे भव्य मंदिर. या गावात प्रवेश करतानाच मंदिराचे दर्शन होते.
दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी होताना दिसत आहे.
मच्छीमार समाजानं भक्तीप्रेमाने भारावून वैशाख शुद्ध पंचमी शके 1803 सन 1881 मध्ये या मंदिरांची स्थापना केली आहे.
सातपाटी गावामधे मच्छीमार समाजाबरोबरच मुस्लिम, भंडारी, माळी अशी लोकवस्ती असून सर्व गाव गुण्यागोविंदाने दरवर्षी राम नवमी उत्सव या मंदिरात साजरा करतात.
या मंदिराचं आणि गावकऱ्यांचं महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 1948 साली साने गुरुजींनी ग्रामस्थांच्या सहकार्यानं दलितांना या मंदिरात प्रवेश दिला होता.
याच मंदिर परिसरात संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेबरोबर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याच्या आवाहनानंतर मोठ्या संख्यनं ग्रामस्थ चले जाव चळवळीत सहभागी झाले होते.