Donald Trump: अमेरिकेत नो ट्रान्सजेंडर, WHO मधून आऊट, BRICS ला धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांचे 10 धडकी भरवणारे निर्णय!
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. (Donald Trump)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोनाल्ड ट्रम्प यांनी भाषणात जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले. तसेच जग तिसऱ्या महायुद्धाच्या अगदी जवळ आल्याचा दावा देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केला. तसेच अनेक धडकी भरवणारे निर्णय देखील घेतले. यामधील डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय पुढील प्रमाणे आहेत. (Donald Trump)
1. आजपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत फक्त स्त्री व पुरुष या दोनच गटांना मान्यता असेल. अमेरिकन सरकारची ही अधिकृत भूमिका असेल, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत नो ट्रान्सजेंडर असा निर्णय जाहीर केला आहे.(Donald Trump)
2. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या शासकीय आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. (Donald Trump)
3. कॅनडा व मेक्सिको या दोन देशांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारणार असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.(Donald Trump)
4. मंगळ ग्रहावर अमेरिकन तारेचा ध्वज लावण्यासाठी अंतराळवीर पाठवणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. (Donald Trump)
5. अमेरिकेमधील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. (Donald Trump)
6. गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलण्याची घोषणा यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.(Donald Trump)
7. अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. (Donald Trump)
8. अमेरिका-मेक्सिको सीमेवर आणीबाणी लागू करणार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.(Donald Trump)
9. पनामा कावला परत घेणार असल्याचे संकेत देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. (Donald Trump)
10. अमेरिकेत राहणाऱ्या परदेशी टोळ्यांना लक्ष्य करण्यासाठी 1798 च्या विदेशी शत्रू कायदा लागू करण्याचे आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहे. (Donald Trump)