Swapna Shastra : तुम्हालाही 'ही' 4 स्वप्नं दिसली तर चुकूनही कोणाला सांगू नका; शुभ कार्यात येईल मोठ्ठा अडथळा
आपली स्वप्न इतरांना सांगणं न सांगण्याचे अनेक अर्थ आहेत. काही मान्यतेनुसार, स्वप्न इतरांना सांगितल्याने त्याचा शुभ प्रभाव कमी होतो तर काही लोकांची मान्यता आहे की, यामुळे इतरांच्या नकारात्मकतेमुळे स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्याला पडलेली स्वप्न इतरांना सांगितल्यास त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊयात.
स्वप्न शास्त्रानुसार, काही विशेष स्वप्नांबद्दल कोणालाही सांगू नये. यामुळे स्वप्नांचा शुभ प्रभाव कमी होतो. त्याचबरोबर, त्याचा नकारात्मक परिणामही होतो.
जर एखादी व्यक्ती स्वप्नात धनसंपत्ती, सोनं किंवा आर्थिक समृद्धीच्या संबंधित स्वप्न बघत असेल तर या संदर्भात कोणालाही काहीही सांगू नये. यामुळे तुमची आर्थिक प्रगती थांबू शकते.
स्वप्नात तुमच्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू दिसत असेल तर ते स्वप्न अशुभ मानलं जातं. अशी स्वप्न असा संकेत देतात की, तुमच्या आयुष्यातील संकटांचा आता अंत होणार आहे. त्यामुळे अशी स्वप्न कोणालाही सांगू नयेत.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नांत देवी-दैवतांचं दर्शन मिळत असेल किंवा एखादा आध्यात्मिक अनुभव मिळत असेल तर अशी स्वप्नं चुकूनही कोणाला सांगू नयेत. असे केल्यास तुमची आध्यात्मिक प्रगती थांबेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)