Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
त्यावेळी त्यांनी मला उत्तर दिलं नाही, पण माझ्या आईकडे वळून म्हणाले ती, मी याच्यासाठी काय करत आहे आणि तो फक्त माझ्याकडे तक्रार करत आहे. यानंतर माझ्या आईनं मला सांगितलं की, या चित्रपटासाठी घर आणि गाड्या गहाण ठेवल्यात. मग मला कळलं की, माझ्यासाठी काय-काय केलं जातंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी आपल्या मुलाला यशस्वी अभिनेता बनवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. राकेश यांनी हृतिकच्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांचं घर आणि गाड्या गहाण ठेवल्या होत्या.
25 वर्षांपूर्वी, हृतिक रोशनचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यानं त्याला रातोरात सुपरस्टार बनवलंच नाही तर बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही मोडले.
हृतिक रोशनचा पहिला चित्रपट फक्त 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. त्यानंतर, प्रदर्शित होताच, त्यावेळी चित्रपटानं 78 कोटी रुपयांची भरघोस कमाई केली.
या चित्रपटासाठी फक्त हृतिक रोशननंच खूप मेहनत घेतली नाही, तर राकेश रोशन यांनीही आपल्या मुलासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं.
नेटफ्लिक्सची डॉक्युमेंट्री 'द रोशन्स'मध्ये हृतिक रोशननं त्या आठवणींना उजाळा दिला, त्यानं सांगितलं की, त्यावा स्टार बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी रात्रंदिवस एक केला.
याबद्दल बोलताना हृतिक म्हणाला की, माझे वडील माझ्या आयुष्यातील माझ्यावर मनापासून प्रेम करणारे व्यक्ती आहेत. स्वतःवर कधी कठोर व्हायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. हृतिकनं त्याच्या वडिलांच्या पडत्या काळांबद्दलही सांगितलं. तो म्हणाला की, मी नेहमीच अर्धा भरलेला ग्लास पाहायचो.
हृतिक म्हणाला की, मी दोन-तीन वर्षांपर्यंत फिल्मचे कलर करेक्ट केले नाहीत.मी ते करू शकलो नाही आणि ओवरसीज प्रिंट्स गेलेही होते. मी यासाठी माझ्या वडिलांकडे गेलो आणि त्यांना विचारलं की, तुम्ही हे कसं सोडून दिलं. पहिल्यांदाच माझ्या वडिलांनी मला कोणतंही दिलं नाही, मी परत आलो.