मार्च ते मे...घामटा निघणार! केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी
यंदाचा उन्हाळाची तीव्रता जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अंगाची लाहीलाही होऊ शकते. राज्यातील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर कोकणात देखील मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार, तापमान 40 अंशांपार जाण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. पण याची तीव्रता कमी असणार असे हवामान विभागाने सांगितलेय.
मार्च महिन्यात देशातील अनेक भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये ईशान्य भारतासह मध्य भारत आणि उत्तर भारताचाही समावेश आहे. देशातील काही भागात सरासरी तापमानापेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना (अॅडवायजरी) जारी केली आहे.
संभाव्य उष्माघातासाठी काय करावे, काय करु नये, याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याशिवाय उष्णतेमुळे होणाऱ्या आजारासंदर्भातही माहिती दिली आहे.
उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ आणि अति उष्णता असल्यानंतर जेवण तयार करु नका... विशेष करुन दुपारी 12 ते दुपारी तीन या दरम्यान घराबाहेर उन्हात जाऊ नका... त्याशिवाय तहान न लागली तरीही पाणी प्या... असे मार्गदर्शक सूचनामध्ये सांगण्यात आलेय. फेब्रुवारी महिन्यातील हे तापमान अल्पकाळासाठी वाढलेलं तापमान आहे.
ओरल रिहायड्रेशन सॉल्यूशन (ओआरएस) याचा वापर करा...
त्याशिवाय घरात तयार केलेले लिंबू-पाणी, छास, लस्सी, ज्यूस याचं जास्तीत जास्त सेवन करा..
घरातून दुपारच्या वेळी बाहेर येऊ नका..टरबूज, कलिंगड, संत्रा यासारख्या फळांचं सेवन करा.
तसेच सुती कपडे परिधान करा.. गडद रंगाचे कपडे परिधान करु नका.. उन्हात जाताना डोकं झाका...