ISRO XPoSat Mission : इस्रोची नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम, नववर्षात ISROची अवकाशात भरारी!
आज नववर्षाचा पहिला दिवस. देशभरात न्यू ईयरचं जल्लोषात साजरा करण्यात आलं. अशातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइस्रोनं नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून आपल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपणंही इस्रोनं केलं आहे. (Photo Credit : PTI)
इस्रोनं 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 'क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' (एक्सपोसॅट) मिशनचं प्रक्षेपण केलं. (Photo Credit : PTI)
2023 मध्ये चांद्रयान-3 मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मिशनद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोनं यावर्षी(2024) अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं आहे. (Photo Credit : PTI)
इस्रोनं सांगितलं की, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली. मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे. एक्सपोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे, जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल. (Photo Credit : PTI)
XPoSAT उपग्रह वर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केला जाईल. हा उपग्रह अवकाशात होणाऱ्या किरणोत्सर्गाचा अभ्यास करेल. त्यांच्या स्रोतांचे फोटो घेतील. (Photo Credit : PTI)
हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्रोतांचा अभ्यास करणार आहे. जसं- पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा. हा उपग्रह 650 किमी उंचीवर पाठवण्यात येणार आहे. (Photo Credit : PTI)
2017 मध्ये इस्रोनं हे अभियान सुरू केलं होतं. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे 22 मिनिटं, एक्सपोसॅट उपग्रह त्याच्या नियुक्त कक्षेत तैनात केला जाईल. या उपग्रहामध्ये दोन पेलोड्स आहेत. पहिला - पोलिक्स (POLIX) आणि दुसरा - एक्सपेक्ट (XSPECT). (Photo Credit : PTI)
पोलिक्स हा या उपग्रहाचा मुख्य पेलोड आहे. हे रमण संशोधन संस्था आणि यूआर राव सॅटेलाइट सेंटर यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. 126 किलो वजनाचे हे उपकरण अवकाशातील स्रोतांचे चुंबकीय क्षेत्र, रेडिएशन, इलेक्ट्रॉन इत्यादींचा अभ्यास करेल.(Photo Credit : PTI)
XSPECT म्हणजे, एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोपी आणि वेळ. ते 0.8-15 keV श्रेणीच्या ऊर्जा बँडचा अभ्यास करेल.यात हे पल्सर, ब्लॅक होल बायनरी, कमी-चुंबकीय क्षेत्राचे न्यूट्रॉन तारे, मॅग्नेटार इत्यादींचा समावेश असेल. (Photo Credit : PTI)