दोन वर्षांनी माथेरान पर्यटकांनी बहरलं, विकेंड आणि थर्टी फर्स्टचा जुळून आला योग, Photos
मुंबई जवळचं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये वर्षातल्या शेवटच्या विकेंडसाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी माथेरानला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय.
यंदा राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवले असून त्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर नववर्षाचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे.
यंदा नववर्ष आणि विकेंड एकत्र आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळी जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळेच मुंबई जवळचं थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे.
विकेंड आणि नववर्षाचं स्वागत असा यंदा जुळून आलेला योग साजरा करण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत आहेत.
माथेरानमध्ये यंदा विकेंड आणि थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
शुक्रवारी माथेरानमध्ये जवळपास ७ हजार पर्यटक दाखल झाले असून शनिवारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी आणखी ७ ते ८ हजार पर्यटक माथेरानमध्ये येण्याची शक्यता आहे.
पर्यटकांसाठी माथेरान नगरपालिकेकडून लाईट, पाणी, स्वच्छता अशी सगळ्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यटकांसाठी काही दिवसांपूर्वीच ई रिक्षा सुद्धा सुरू करण्यात आली असून त्याचाही पर्यटकांना मोठा फायदा होतोय.
पर्यटकांच्या स्वागतासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती माथेरान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली आहे.