In Pics : चहाच्या दुकानावर काम करणारा मुलगा बनला फुटबॉलचा देव, थक्क करणारा पेले यांचा जीवनप्रवास
ब्राझीलचे सार्वकालिक महान फुटबॉलर पेले यांचं वयाच्या 82व्या वर्षी कर्करोगानं निधन झालं. (P.C. pele Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या फुटबॉल कारकिर्दीत कितीतरी गोल आणि मॅचविनिंग खेळी करणारे पेले यांनी जगाला दाखवलं की मेहनतीच्या जोरावर गरीबीतूनही साम्राज्य उभा करता येतं
कारण अगदी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या पेले यांनी फुटबॉल जगतावर राज्य केलं. एक-दोन नाही तर तीन विश्वचषक जिंकले.
पण हेच पेले एकेकाळी पैसे कमवण्यासाठी चहाच्या दुकानावर काम करत होते. पण हाच चहा दुकानावर काम करणारा मुलगा पुढे जाऊन फुटबॉल जगताचा सार्वकालिक महान फुटबॉलर बनला.
पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमध्ये झाला. डोनडिन्हो असं पेले यांच्या वडिलाचं नाव असून ते देखील स्ट्रायकर म्हणून लोकल क्लबकडून खेळायचे. ज्यामुळे पेलेंच्या रक्तातच फुटबॉल होतं.
जगभरात पेले प्रसिद्ध होण्याआधी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. कारण आधीपासूनच घरची परिस्थिती जेमतेम होती. गरिबीत वाढलेल्या पेलेंना वेळप्रसंगी पैसे कमवण्यासाठी चहाच्या दुकानात देखील काम करावं लागलं..
वडिलांकडून त्यांना फुटबॉलचे बेसिक धडे शिकायला मिळाले. पण प्रॉपर फुटबॉल परवडत नाही आणि तो अगदी पेपरपासून किंवा मिळेल त्या गोष्टीने तयार केलेल्या बॉलच्या आकाराच्या वस्तून पेले फुटबॉलची प्रॅक्टिस करत
त्यांचं फुटबॉलप्रतिचं प्रेम आणि मेहनतीच्या जोरावर वयाच्या 13 वर्षीच ते लोकल क्लब बौरूकडून आणि 1956 म्हणजे 16 वर्षाचे असताना ब्राझीलियन फुटबॉल क्लब सेन्टॉसकडून पेलेंनी खेळायला सुरुवात केली.
पेले यांच्या 21 वर्षांच्या झळाळत्या कारकीर्दीत तब्बल 1366 सामन्यांमध्ये 1281 गोल्स त्यांनी केले. यातील अधिकृत सामन्यांची आकडेवारी सांगायची तर पेलेंनी 812 सामन्यांमध्ये 757 गोल्स मारले होते. या दरम्यानच 1958, 1962 आणि 1970 साली विश्वचषक पेले यांनी ब्राझीलला वर्ल्डकप जिंकवून दिला.
दरम्यान मोठमोठ्या ब्रँडशी देखील पेले जोडले गेले आणि चहाच्या टपरीवर काम करणारा एक मुलगा आपल्यानंचर कोट्यवधींची संपत्ती कुटुंबियासाठी सोडून गेला आहे