PHOTO: औरंगाबाद पोलीस भरतीची मैदानी चाचणी 2 जानेवारीपासून
त्यानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यात भरतीची प्रकिया सुरु झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलासाठी एकुण 39 पदे भरली जाणार आहे.
यासाठी उमेदवारांची मैदानी चाचणी व शैक्षणिक पात्रता तपासणी प्रक्रियेला 2 जानेवारी 2023 पासुन सुरूवात होणार आहे.
औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनिष कलवानिय यांनी आज पोलीस भरती प्रक्रियेबाबत नियोजनाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी सुलभ व पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया राबविण्याचे दृष्टीकोनातुन अधिकारी व अंमलदार, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांना सुचना व मार्गदर्शन केले आहे.
प्रत्येक मैदानी चाचणी करिता उमेदवारांनी प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या दिनांका प्रमाणे वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन देखील कलवानिय यांनी केले आहेत.
शारिरीक व मैदानी चाचण्याची संपुर्ण पणे व्हिडीओग्राफी केली जाणार आहे.
त्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे नातेवाईकांनी कोणत्याही एजंट, दलाल, अधिकारी, कर्मचारी, यांच्या भुलथापाना किंवा आमिषाला बळी पडु नये.
या संपुर्ण प्रक्रियेमध्ये कोणाचाही वशीला,ओळख याचा उपयोग होणार नाही, असेही पोलीस अधीक्षक म्हणाले.