Tomato : टोमॅटोचे दर वाढले, ग्राहकांची खरेदीकडे पाठ; दरात घसरण
सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात देखील टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 100 ते 120 रुपयांच्या आसपास आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
टोमॅटोला उठाव नसल्यानं नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. APMC बाजार समितीत प्रतिकिलो टोमॅटोला 70 रुपयांचा दर मिळत आहे.
महाग झालेल्या टोमॅटोकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळं टोमॅटोच्या किंमती उतरल्या आहेत. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये चार दिवसापुर्वी 100 रुपये किलोवर गेलेला टोमॅटो आज 70 रुपयांवर आला आहे.
गेल्या काही दिवसात किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटोचे दर 130 ते 150 रुपयांवर गेला होता. टोमॅटोचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
एपीएमसीत आलेल्या टोमॅटोला उठाव नसल्यानं होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर हे 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
एपीएमसी मार्केटला नेहमी 40 ते 50 टोमॅटो गाड्यांची असणारी आवक सद्या 15 ते 20 गाड्यांवर आली आहे.
15 एप्रिलपासून तीन ते चार जूनपर्यंत बाजारात टोमॅटो फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
25 जुलैच्या पुढे टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर टोमॅटोच्या दरात आणखी घट येऊ शकते.